Breaking News

‘आयसीसी’चा कसोटी, एकदिवसीय संघ जाहीर

लंडन, दि. 23 -  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज वार्षिक पुरस्कार सोहळ्यादरम्यान सर्वोत्कृष्ट एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा केली.  परिषदेच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व इंग्लंडच्या अ‍ॅलिस्टर कुक याला देण्यात आले आहे. या संघात इंग्लंडच्या चार खेळाडूंना स्थान मिळाले आहे. भारताच्या मात्र फक्त  एकाच खेळाडूला (आर.अश्‍विन) संघात स्थान देण्यात आले आहे.
परिषदेच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. कोहलीबरोबरच संघात रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांचीही निवडे करण्यात आली  आहे. दोन्ही संघांची निवड राहुल द्रविड, गॅरी कर्स्टन आणि कुमार संगाकारा या त्रिसदस्यीय समितीने केली आहे.
कसोटी संघ : डेव्हिड वॉर्नर, अलिस्टर कुक, केन विल्यमसन, जो रूट, अडम वोजेस, जॉनी बेअरस्टो, बेन स्टक्स, अश्‍विन, रंगना हेराथ, मिचेल स्टार्क, डेल  स्टेन, स्टीव्हन स्मिथ (राखीव)
एकदिवसीय संघ : डेव्हिड वॉर्नर,क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, विरटा कोहली, अब्रहाम डिव्हिलियर्स, जोस बटलर, मिचेल मार्श, रविंद्र जडेजा, मिचेल स्टार्क,  कगिसो रबाडा, सुनील नारायण, इम्रान ताहीर (राखीव)