शिवस्मारकासाठीच्या जल-माती कलशाची मुंबईत शोभायात्रा
मुंबई, दि. 23 - शिवस्मारकासाठी 36 जिल्ह्यांमधून आलेल्या जल-मातीच्या कलशाची आज मुंबईतून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर हे कलश मुख्यमंत्र्यांना सोपवले जाणार आहेत. शिवस्मारकाच्या भूमीपूजनाची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. जळगावमधील भाजपच्या पदाधिकार्यांनी तापी, पूर्णा, गिरणा, पांझरा आणि बोरी नद्यांचं पाणी संकलित केलं, तर संत मुक्ताई, चांगदेव, सखाराम महाराज आणि असीरगडमधली माती एकत्र केली.
कोल्हापुरातल्या पन्हाळा, विशाळगड, सामानगड, भुदरगड, रांगणा अशा किल्ल्यांवरची माती, आणि पंचगंगा आणि कृष्णेच्या संगमाचं जल संकलित करण्यात आलं आहे. नांदेडमधल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावरची माती भाजपच्या पदाधिकार्यांनी संकलित केली. अहमदनगरमध्ये मुळा, प्रवरा आणि सीना नदीचं पाणी, तर प्रेमगिरी किल्ली, विश्रामगड, भुईकोट किल्ला, हरिश्चंद्रगड, रतनगड आणि खर्डा किल्ल्यातली माती संकलित करण्यात आली.