Breaking News

रशियाचं लष्करी विमान उड्डाण घेतल्यानंतर 20 मिनिटात बेपत्ता

सोची, दि. 25 - रशियाचं लष्करी विमान रडारवरुन उड्डाण घेताच केवळ 20 मिनिटात बेपत्ता झालं आहे. एका वृत्तसंस्थेने हे वृत्त आपत्कालीन मंत्रालयाच्या हवाल्याने दिलं असून बेपत्ता विमानाचं नाव टीयू 154 असल्याचं बोललं जात आहे.
स्थानिक रिपोर्ट्सनुसार विमानात 82 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर आहेत. प्राथमिक माहितीनुसार हे लष्करी विमान दक्षिण रशियातील सोची येथून सीरियातील लटाकीया प्रांतात जात होतं.
दरम्यान रशियाकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विमान रशियाच्या समुद्रच्या हद्दीतूनच बेपत्ता झाल्याची माहिती आहे. विमानाचा संपर्क नेमका का तुटला, याचा आता शोध घेतला जात आहे.