नोटाबंदीनंतर बॉक्स ऑफिसवर आमीरची दंगल
पहिल्या दिवशी कमावले 29.78 कोटी
मुंबई, दि. 25 - आमीर खानच्या बहुप्रतिक्षीत ‘दंगल’नं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या दंगलनं 29.78 कोटींची कमाई केली आहे. मात्र सुलताननं केलेलं रिकॉर्ड दंगलला मोडता आलं नाही.शाहरुखच्या फॅनला मागे सारत आमीरचा दंगल दुसर्या नंबरवर आला आहे. काल रिलिज झालेला दंगल पहिल्या तीन दिवसात 100 कोटींचा गल्ला कमावेल असा अंदाज सिने अनालिटीक तरन आदर्श यांनी व्यक्त केला आहे.
सिनेमाचं कथानक हरियाणातील पैलवान महावीर सिंह फोगट यांच्या जीवनावर आधारीत आहे. आमीर खाननं महावीर सिंह फोगट यांची भूमिका जीवंत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या सिनेमात महावीर सिंह फोगट यांनी आपल्या मुली गीता आणि बबीता यांना कशाप्रकारे कुस्तीचं प्रशिक्षण देत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बनवलं.