Breaking News

नाताळानिमित्त भारतासह जगभरात आनंदोत्सव

मुंबई, दि. 25 - येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस हा जगभर ख्रिसमस आणि भारतात नाताळ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने भारतासह जगभरामध्ये ख्रिसमसची धूम सुरू झाली आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकातामध्ये देखील ख्रिसमसचा जल्लोष सुरु झालाय. जिंगल बेल्स, जिंगल बेल्सची धून, केक, भेटवस्तू असं उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय.
मुंबईतल्या विविध चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना केली. मुंबईतील वांद्रे, माहिम चर्चमध्ये ख्रिसमसनिमित्त विशेष ख्रिसमस ट्री, चांदण्या आणि बेल्सची मनमोहक सजावट पाहायला मिळत आहे. मुंबईतील वसईतही नाताळाची धूम पाहायला मिळतेय. वसईत रात्री प्रभू येशूंच्या आगमनाची प्रार्थना करण्यात आली . पहिला मिसा 10 वाजता झाला तर दुसरा मिसा हा 11 वाजता झाला. वसईतील गावं ही सध्या मनमोहक रोशनाईने सजली आहेत.