Breaking News

सत्यमेव जयतेची अनाथांसोबत दिवाळी

बुलडाणा, दि. 03 - ज्ञानेश्‍वर सुरडकर व सुनिता सुरडकर यांच्या अपघाती मृत्युमुळे चिमुकली निकीता सुरडकर, नेहा सुरडकर व रोशन सुरडकर या मुलांच्या डोक्यावरील आई वडिलांची छत्रछाया हरविली. अचानक संकट कोसळलेल्या त्या अनाथ झालेल्या मुलांसोबत सत्यमेव जयते परिवाराने दिवाळी साजरी करून मुलांचे पालकत्व स्वीकारले. या मुलांना शिक्षणाकरीता दत्तक घेवून, शिक्षणाची सोय केली. त्याचबरोबर 33 हजार रूपयांची आर्थिक मदत केली.
सत्यमेव जयते ही संस्था मागील 3 वर्षापासून बेघर, अनाथ, वयोवृध्द व आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांसाठी काम करीत आहे. मायेचे छत्र हरविलेल्या त्या मुलांना दिवाळीला आई वडीलांची उणीव भासू नये, याकरिता सत्यमेव जयते परिवाराचे सदस्य पिंप्री गवळी या गावात जावून त्यांनी त्या मुलांसोबत दिवाळीचे फराळ देवून फटाके दिले. यावेळी सत्यमेव जयते परिवाराचे नितेश थिगळे, चिखली येथील मंडळ अधिकारी अरविंद शेळके, तलाठी संजय डुकरे, मयुर निकम, परमानंद थिगळे, सोहम काळे, सरपंच गजानन पवार, वासुदेव पाटील, सुधाकर बोरसे उपस्थित होते.