Breaking News

अपघातग्रस्त कुटुंबास राजर्षी शाहू पतसंस्थेकडून मदतीचा हात!

बुलडाणा, दि. 03 - धामणगाव बढे येथील अल्पबचत प्रतिनिधी अरूण काटे यांच्या अपघाती मृत्यू झाला. मृत्यूनंतर आधार हरविलेल्या काटे कुटुंबियांना दिवाळी तोंडावर आली असता सण कसा साजरा करावा अशा विचारात असतांना बुलडाणा येथील राजर्षी शाहू पतसंस्थेचे संस्थाध्यक्ष संदीप शेळके यांनी  21 हजाराचा आर्थिक मदतीचा आधार त्यांना दिवाळीपुर्वी दिला.
धामणगाव बढे येथील राजर्षी शाहू मल्टीस्टेट को ऑप. क्रेडीट सोसायटीच्या शाखेमध्ये अरूण तुकाराम काटे हे अल्पबचत प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. मागील जुलै महिन्यात पुतण्याच्या लग्नात जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी उषाबाई, मुलगी प्रतिक्षा व मुलगा अभिषेक यांचा आधार हरविल्याने काटे कुटुंब उघड्यावर पडले होते. वडिलांचे छत्र एकाएकी हिरवून गेल्याने आधार हरविलेल्या काटे कुटुंबांसाठी कोणत्या प्रकारची मदत देता येईल हे संस्थाध्यक्ष संदीप शेळके यांनी जाणून घेतले. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी धामणगाव बढे येथे जाऊन उल्हास बढे, विजय उबाळे, सतिष पाखरे, नाना बढे, प्रभारी विभागीय व्यवस्थापक योगेश महाजन, गजानन बोदडे, हमीद कुरेशी व सरोदेसह कर्मचार्यांच्या उपस्थितीमध्ये 21 हजार रूपयांचा धनादेश मृतकाची पत्नी उषाबाई, मुलगी प्रतिक्षा व मुलगा अभिषेक यांच्याजवळ सुपूर्द केला.
संदीप शेळके यांनी काटे कुटुंबियांना धीर देऊन संस्था सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले. संस्थेने सामाजिक बांधीलकी जोपासत अरूण काटे यांच्या दोन्ही मुलांना दत्तक घेऊन दोन्ही भावंडांची शैक्षणिक जबाबदारी स्विकारली आहे. राजर्षी शाहू पतसंस्था सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असते. यापूर्वीही वाघजाळ येथील वडिलांचे छत्र हरविलेल्या चोपडे कुटुंबातील दोन मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करीत आहे.