Breaking News

राजीव गांधी मिलिटरी स्कुलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

बुलडाणा, दि. 03- येथे जिल्हा पातळीवर संपन्न झालेल्या मैदानी खेळामध्ये राजीव गांधी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थिनी यश संपादन करुन विभागीय स्तरावर जाण्याचा मान मिळविला आहे. 
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा द्वारा बुलडाणा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय मैदानी खेळाचे आयोजन केले होते. या मैदानी खेळामध्ये राजीव गांधी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थांची 19 वर्षे वयोगटात 400 मीटर रिलेमध्ये अमोल मोरे, दीपक मोरे, गजानन सपकाळ, राष्ट्रपाल तायडे व 100 मीटर रिले स्पर्धेमध्ये राष्ट्रपाल तायडे, रोहित वाघ, सुनित करवते, नागेश बरडे, वैभव बारे तसेच 200 मि. धावण्यामध्ये नागेश बरडे तर 110 मी. हर्डल्समध्ये राहुल पवार 400 मी हर्डल्समध्ये अमोल मोरे व दीपक मोरे तर तिहेरी उडीमध्ये प्रणव अंभोरे यांनी यश संपादन केले. 17 वर्षाखालील वयोगटामध्ये 100 मि. रिलेमध्ये हर्षल मोरे अनिकेत चौधरी शिवम वाढे, प्रफुल्ल राठोड व मेहुल पाचपोळ तर 100 मी., 400 मी. व 800 मी. धावण्यामध्ये हर्षल मोरे व पुरुषोत्तम मोरे यांनी यश संपादन केले व 14 वर्षाखालील वयोगटामध्ये 400 रिलेमध्ये अश्‍वीन वाघ, आदित्य सावळे, आसिफ तडवी, प्रथमेश जोशी व तुषार तायडे तर 200 मी., 400 मी. व 600 मी. धावण्यामध्ये आदित्य सावळे व अश्‍विन वाघ यांनी यश संपादन केले. तसेच 80 मी. हर्डल्समध्ये सौरभ निर्मळे यांनी यश प्राप्त केले. क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये अमोल मोरे याने द्वितीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर होणार्या स्पर्धेमध्ये निवड झाली असून, त्यांच्या या यशासाठी त्यांचे प्रशिक्षक शिक्षण निदेशक प्रकाश खेत्रे यांनी परिे्रम घेतले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष विश्‍वनाथ माळी, विद्या माळी, मुख्याध्यापक रवींद्र पडघान, उपमुख्याध्यापक शैलेश वारे, पर्यवेक्षक संजय मोरे, प्रसाद पत्की क्रीडा समिती अध्यक्ष प्रकाश खेत्रे व सचिन दिनेश नागनाथवार तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.