Breaking News

अजिक्य चुडिवाल यांचे इंग्लड येथे काँग्नीझन्ट कंपनीच्या दौर्‍याकरीता निवड

श्रीरामपूर, दि. 04 -  येथील अजिक्य भरत चुडिवाल इंग्लड (यु.के.) येथे काँग्नीझन्ट कंपनीच्या आभ्यास दौरे करीता निवड झाली आहे. ते रवाणा झाले आहेत.  अजिक्य चुडिवाल हे दिंगबर जैन समाजाचे माजी आध्यक्ष मोतीलाल चुडिवाल यांचे नातु असुन सचिन चुडिवाल याचे पुतने तर साधना मेडिकल संचालक भरत  चुडिवाल यांचे चिरजीव आहेत. काँग्नीझन्ट कंपनीच्या वरिष्ठ आधिकारी हरिष पागे व दिपक पाटील यांचे त्यानां मार्गदर्शन भेटले आहे. काँग्नीझन्ट कंपनीच्यावतीने  नव्याने प्रोजेक्टसाठी अजिक्य चुडिवाल यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत ससाणे, नॉबचे अध्यक्ष भांगचंद चुडिवाल, जेष्ठ  पत्रकार रमेश कोठारी, सतिष गोधा, अनिल पांडे आदिनी अभिनंदन केले.