Breaking News

तालुक्यातील वीज, पाणी, रस्ते प्रामुख्याने मार्गी लावणार - मुरकुटे

अहमदनगर, दि. 04 - पिंप्रीशाहली येथे विविध विकासकामांचे उदघाटन तालुक्यात अनेक दिवसापासून वीज रस्ते पाणी हेच प्रश्‍न मुख्यता शेतकर्‍यासह  सर्वसामन्यांना कायमच भेडसावत आहेत हीच नस अनेक दिवसापासून सर्वसामन्यच्या मनात  सलत होती. तुम्ही परिवर्तन घडवून सर्व जबाबदारी माझ्यावर टाकली  आता तालुक्याचा विकास घडवून तालुक्यातील वीज पाणी रस्ते प्रामुख्याने मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पिंप्रीशहाली येथे  केले पिंप्रीशाहली ते मठाचीवाडी या रस्त्याचे डांबरीकरण व हनुमान मंदिर समोरील सभा मंडपचे उदघाटन नुकतेच महंत भास्करगिरी महाराज व  आमदार  बाळासाहेब मुरकुटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी गणेशानंद महाराज  जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिनकरराव गर्जे भाजपचे युवा नेते सतीशराव  कर्डिले कृष्णदेव महाराज माजी सरपंच चंद्रकांत नवथर लक्षाधीश दाणे संभाजी नवथर जानुभाई शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार मुरकुटे म्हणाले की तालुक्यातील सर्व प्रश्‍न सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे तुम्ही हक्काने कामे सांगा ती करण्याची जबाबदारी माझी  यापूर्वीच्या लोकप्रतिनिधीणी कधी तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न तर सोडाच परंतु तुमच्याकडे कधी डोकावून सुद्धा पहिले नाही त्यामुळे होणार्‍या जिल्हा  परिषद पंचयात समिती निवडणुकीत तुम्ही सर्वसामन्य आणि काम  करणारा व जनसामान्यातील नेता निवडून काम करण्याची संधी द्यावी असे म्हणाले यावेळी   युवा नेते गणेश गोसावी दत्तात्रय नवथर कल्याण थोरात श्रीधर ठोबळ शंकर नवथर महेंद्र मुळे राजू शेख आदि कार्यकर्त उपस्थित होते.