Breaking News

ह.भ.प. गायत्रीताई वाघ यांना आदर्श माता सन्मान पुरस्कार

अहमदनगर, दि. 04 - नेवासा तालुक्यातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा व श्री.रविंद्र मुनोत नेवासकर यांच्या मातोश्री स्वर्गीय रमादेवी मुनोत (जीजी) यांच्या  स्मरणार्थ देण्यात येणारा आदर्श माता सन्मान 2016-17 या वर्षाच्या पुरस्कारासाठी नेवासा येथील प्रसिध्द वास्तुविशारद सुनिल वाघ यांच्या मातोश्रीं ह.भ.प.  गायत्रीताई पंडितराव वाघ यांना जाहिर झाला आहे. पुरस्कार निवडीचे पत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले.
पुरस्कार निवडीचे पत्र प्रदान प्रसंगी पंडितराव वाघ,वस्तुविशारद सुनीलभाऊ वाघ, सौ.वाघ, मोहिनीराज देवस्थानचे विश्‍वस्त जयंत देवचक्के, पत्रकार सुधीर चव्हाण  उपस्थित होते.
विठ्ठल रुखमाईची मुर्ती, सन्मानपत्र, ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी, महावस्त्र, मानधन रू. 5555/-असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदरचा पुरस्कार हा डिसेंबर 2016 मध्ये  श्री क्षेत्र देवगड श्रीगुरुदेवदत्त पीठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज, संत ज्ञानेश्‍वर मंदिराचे प्रमुख गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख, ह.भ.प. उद्धव महाराज  नेवासेकर, महंत सुनीलगिरी महाराज, भामाठाणचे रामायणाचार्य अरुणगिरी महाराज यांच्या उपस्थितीत जानेवारी 2017 या महिन्यात प्रदान करण्यात येणार  असल्याचे या उपक्रमाचे प्रमुख संयोजक रविंद्र मुनोत यांनी सांगितले.