विश्वविजेत्या कबड्डीपटूंना प्रत्येकी दहा लाखांचे इनाम
नवी दिल्ली, दि. 05 - भारताच्या विश्वचषक विजेत्या कबड्डी संघातल्या खेळाडूंना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे इनाम देण्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्रालयालने केली आहे.
अनुप कुमारच्या भारतीय संघाने इराणवर मात करुन सलग तिसर्यांदा कबड्डीचा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम नुकताच गाजवला आहे. अंतिम सामन्यात भारताने इराणचा 38-29 असा धुव्वा उडवला.
केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या निवासस्थानी भारतीय कबड्डी संघातल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येईल. कबड्डी खेळाडूंसह प्रशिक्षकांनाही इनाम देण्यात येईल असं विजय गोयल यांनी सांगितले.