Breaking News

वारणेच्या काठी शहीद नितीन कोळींना अखेरचा सलाम

सांगली, दि. 02 - शहीद नितीन कोळी यांच्यावर सांगलीतील दुधगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा देवराज आणि भाऊ उल्हास यांनी नितीन यांना मुखाग्नी दिला. यावेळी अवघा जनसमुदाय शोकाकुल झाला होता.
शुक्रवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात नितीन कोळी शहीद झाले होते. श्रीनगरच्या लष्करी तळावर लष्कराने त्यांना अंतिम सलामी दिली होती. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांचे मूळगाव असलेल्या सांगलीतील दुधगावमध्ये आणण्यात आले होते.
यावेळी नितीन कोळी यांच्या अंत्यदर्शनासाठी अवघी अलोट गर्दी जमली होती. एकीकडे नितीन कोळी यांचा अंत्यविधी सुरु होता आणि दुसरीकडे ‘शहीद नितीन  कोळी अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद‘ च्या घोषणा दिल्या जात होत्या.