। शेतकर्यांनी चांगल्या प्रतीचे सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणावेत । नाफेडच्या खरेदीकेंद्रीत चांगला हमीभाव मिळणार
जामखेड (प्रतिनिधी)। 05 - जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन नाफडे यांच्या विद्यमाने शासकीय आधारभूत किमतीनुसार सोयाबीन खरेदी केंद्राची सुरुवात दि. 3 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. बाज़ार समितीचे सभापती गौतम अण्णा उतेकर व उपसभापती शरद भोरे यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्या हस्ते सोयाबीन खरेदी केंद्राची सुरुवात करण्यात आली. या वेळी संचालक सुधीर राळेभात पाटील, पृथ्वीराज वाळुंजकर,मकरंद आबा काशीद, संजय वराट, करण ढवळे, विनोद नवले पाटील, सागर सदाफुले हे सर्व संचालक तसेच राजेंद्र कोठारी,काकासाहेब गज्रे,अरुण महारनवर,त्रिंबक कुमटकर, जिल्हा माकेटिंग अधिकारी घागरे, बाजार समितीचे सचिव वाहेदभाई सय्यद, सर्व अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व व्यापारी उपस्थित होते. या वेळी सभापती उतेकर म्हणाले, जामखेड तालुक्यातील शेतकर्यांच्या मालाला हमीभाव मिळण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकर्यांनी चांगल्या दर्ज़ाची सोयाबीन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावी. शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार चांगल्या मालाला 2 हज़ार 775 रुपये भाव दिला ज़ाईल. थोडयाच दिवसांत मकाचीही आधारभूत किमतीनुसार 1365 रुपये भावाने खरेदी केली ज़ाईल,असे उतेकर या वेळी म्हणाले.