Breaking News

आता एसटी स्थानकात मिळणार जेनेरिक औषधे

मुंबई, दि. 02 - राज्यातील एसटी स्थानकांवर आता जेनेरिक औषधे विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत. नुकताच राज्य सरकारने बैठकीत यासंबंधी निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वस्त दरात औषधे मिळणार आहेत.
राज्यातील 568 एसटी आगारांमध्ये जेनेरिक औषधे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. एसटी महामंडळाकडून यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र  सरकारनेही जेनेरिक औषधे विकण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही जेनेरिक औषधे सहजपणे उपलब्ध नसल्याने आता ती एसटी स्थानकांमध्ये विक्रीसाठी ठेवली  जातील. दरम्यान राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर एसटी महामंडळाच्या अधिकारी आणि आरोग्य विभागाची संयुक्त बैठकही होणार आहे. यात जेनेरिक औषधांची  विक्री कशी करायची याचा विचार केला जाईल.