Breaking News

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यभरात 475 कोटींच्या सोन्याची विक्री

मुंबई, दि. 02 - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या दिवशी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करण्यात येते. सोन्याचे दर कितीही असले तरी पाडव्याला आवर्जून सोने विकत घेण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे.
राज्यातील शहरा-शहरात सर्वच प्रमुख ज्वेलर्समध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून आली. दिवाळीच्या या चार दिवसात राज्यभरात 475 कोटी  रुपयांच्या सोन्याची विक्री झाल्याची माहिती आहे.
सोन्याचा दर जास्त असूनही अनपेक्षितरित्या झालेल्या या विक्रीने सोने व्यापारीही आनंदात आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा सोन्याचा दर जास्त असूनही  मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. यावरुन यंदा राज्यात शेतीचे उत्पादन चांगले झाले असल्याचा अंदाज व्यापार्‍यांकडून वर्तवण्यात येत आहे.