Breaking News

25 लाखांच्या खंडणीप्रकरणी औरंगाबादमधील प्राचार्याला अटक

औरंगाबाद, दि. 05 - औरंगाबाद मराठवाडा अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्यांना 25 लाख खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. प्राचार्य इम्रान उस्मान यांच्यासह चिश्ती हबीब यालाही अटक करण्यात आली आहे.
कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. सोहेल खान यांच्याकडे तब्बल 25 लाखांची मागणी करण्यात आली होती. सोहेल खान प्राचार्य असताना त्याच्या लॅपटॉपवर चुकून पॉर्न व्हिडिओ सुरु झाली. याच प्रकरणी बदनामीची धमकी देऊन इम्रान उस्मान यांनी खंडणी मागितली होती.
लॅपटॉपवर चुकून पॉर्न व्हिडिओ सुरु झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज काढून बदनामी करण्यात येईल. अशी धमकी इम्रान यांनी सोहेल खान यांना दिली होती. बदनामीच्या भीतीपोटी सोहेल खान यांनी इम्रान खान यांना 5 लाख 5 हजार रुपये चेकने दिले होते.