रेल्वे प्रवासात लॅपटॉप आणि मोबाईलला विमा कवच
नवी दिल्ली, दि. 10 - आयआरसीटीसी आता प्रवाशांच्या मोबाईल आणि लॅपटॉपसारख्या उपकरणांसाठीही विमा योजना सुरु करण्याच्या विचारात आहे. रेल्वे प्रवाशांसाठी सुरु केलेल्या विमा योजनेच्या यशानंतर रेल्वे प्रशासनाने हा विचार चालवला आहे. यासंबंधी आयआरसीटीसी आणि विमा कंपन्याच्या अधिकार्यांची पहिली बैठकही झाली आहे. आयआरसीटीसीचे अध्यक्ष ए के मनोचा यांनी ही माहिती दिली.
विमा कंपन्यांनी खोट्या दाव्यांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही काही पर्याय दिले आहेत आणि त्यावर विमा कंपन्यांची मते मागितली आहेत. प्रवासी विम्यासोबतच आम्ही गॅझेट्ससाठी विमा सुरु करण्याच्या विचारात आहोत. त्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचारही आम्ही सुरु केला आहे. सुरुवातीला ही विमा योजना क्रेडिट कार्ड धारक आणि सरकारी कर्मचार्यांसाठी देण्याच्या विचारात आहोत. असेही ते म्हणाले.