Breaking News

नगर-दौंड रोडवरील भीमानदीच्या पुलावर अपघात

अहमदनगर, दि. 28 -  वाळू वाहतूक करणार्‍या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने संदीप मारुती सोनवणे (वय22, रा. माढरेमळा दौंड, जि. पुणे ) व अशोक बापू  सांगळे (वय 45, रा. गोपाळवाडी दौंड, जि. पुणे ) हे मामा- भाचे ठार झाले. हा अपघात  दि. 26 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील  नगर-दौंड रोडवर निमगावखलू येथे भिमानदीच्या पुलावर घडला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. दौंड पोलिसांनी ट्रक चालकाविरुध्द अपघाताच्या गुन्ह्याची  नोंद केली आहे.