Breaking News

दिवाळीच्या किल्ल्यांवर जवानांच्या प्रतिमा

। शहरी व ग्रामीण भागातही किल्ला बनविण्यासाठी बालगोपालांची स्पर्धा

पुणे, दि. 28 - शाळेतील परिक्षांचे दिवस संपले की दिवाळीची धामधुम सुरु होते. दिवाळी म्हटली की बालचमूंसाठी दगड मातीचा किल्ला बनविणे हा आनंददाई  क्षण. दिवाळीची सुट्टी लागताच आता बालगोपाळ किल्ला करण्यात रमले आहेत. या किल्ले बनविण्यासठी बालगोपाल शहरीच नाही तर ग्रामीण भागातही व्यस्त  असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पहावयास मिळत आहे.
सासवड शहरी भाग तसेच ग्रामीण भागात किल्ला करण्याची प्रथा फार मोठी आहे. अनेक वर्षांपासून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत येथे किल्ले केले जातात. यात  बालगोपाळांपासून तरुण तसेच वयस्करही सामील होतात. ज्या ठिकाणी किल्ला करण्यास जागाच नाही त्या ठिकाणी बाजारात मिळणारे तयार किल्ले आणून  बसविले जातात.
 किल्ला घरासमोर तसेच आजूबाजूच्या मोकळ्या जागेत केला जातो. शहरात अनेक किल्ले बनविणे स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामुळे ठिकाणी मोठमोठे किल्ले  करण्याची प्रथा कायम आहे. उरी येथे दहशतवादी हल्यानंतर मध्यंतरी देश ढवळून निघाला. त्यामुळे यंदा किल्ल्यांवर ठेवण्यासाठी मावळ्यांसोबत भारतीय वीर  जवानांच्या प्रतिमा व मूर्ती ठेवण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुलांना शिवाजीमहाराजांच्या कार्याची माहिती व प्रेरणा मिळावी यासाठी शहरात, अन्य  ग्रामीण भागात किल्ल्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.
शहरी व ग्रामीण भागात किल्ले व त्यांच्या आकारात फरक असला तरी बाळगोपाळांचा उत्साह मात्र तोच आहे. परीक्षा संपता संपताच किल्ले करण्याच्या कामास  बच्चेकंपनीने सुरुवात केली आहे. शहरात चित्रे व तयार किल्ले विक्रीसाठी आले आहेत.