Breaking News

विजेच्या खेळखंडोबाला नान्नजकर वैतागले

। विजेच्या कमी - जादा दाबामुळे घरातील विजेवर चालणारी उपकरणे जळाली । लाखोंचे नुकसान 

जामखेड  (प्रतिनिधी)। 28 - तालुक्यातील नान्नज येथील ऐन दिवाळीत विजेचा खेळखंडोबा होत असून सणासुदीच्या काळात नान्नज गावात  तीन दिवस झाले  वीज पुरवठा होत नसल्याने व्यापार्‍यांसह नागरिक व विद्यार्थी  वैतागले आहेत.
 दि. 24 ला नान्नज गावात विज अचानक गायब होऊन नंतर लगेच आल्याने  नान्नज गावातील नागरिकांच्या घरातील कोणाच्या टिव्ही जळाली, कोणाचे संगणक  जळाले, कोणाचे फ्रीज जळाले, फॅन जळाले, बल फुटले, नागरिकांचे ऐन दिवाळीत लाखो रूपयाचे  वस्तूंचे नुकसान झाले आहे आज तिसरा दिवस आहे तरी  महावितरण चे अधिकारी काय करतात ह्याचे कोणालाच ताळमेळ लागेना वरीष्ठ अधिकाराने नान्नज ला जे शिकाऊ वायरमन दिलेले आहे ते कधी ही पाहिले तरी  दारूच्या नशेतच असतात तरी वरीष्ठ अधिकारी ने यांची ताबडतोब बदली करून दुसरे नविन अनुभव असलेले वायरमन नान्नज गावाला देण्यात यावे असे  नान्नजच्या ग्रामस्थांची मागणी आहे यांचे कसलेच गावात लक्ष नाही काय ग्रामस्थांनी वायरमन कडे लाईट बील भरणा करण्या साठी पैसे पण दिले आहे त्या  ग्रामस्थांचे ह्या वायरमन कर्मचारी ने पैसे भरले नाही अशी तक्रार गावातील नागरिकांनी दिली.तसेच यांचे लक्ष गावात नसल्याने शालेय विद्यार्थी यांची सहामाही  परीक्षा चालु असुन विजेच्या लपंडावाने विद्यार्थी पण वैतागले आहे तसेच दुकानदाराचे पण मोठे नुकसान होत आहे याला जबाबदार कोण आहे सोमवारी दि. 24 ला  12 ते 13 तास वीज पुरवठा बंद होते गावात रात्रभर विज नव्हती तसेच दि. 25 ला पण 10 ते 12 तास वीज पुरवठा बंद होता दिवसभर विज गायब होती दि.  26 ला पण 10 ते 12 तास झाले वीज पुरवठा बंद आहे सकाळ पासून वीज गायब झाली आहे कधी सुरळीत होते अजून महावितरणच्या अधिकारी यांनाच माहिती  आहे का नाही अशी चर्चा गावात चालू आहे दिवसभर वीज नसल्याने इन्व्हर्टरची यंत्रणा देखील बंद पडल्याने ग्रामपंचायत च्या कृपा आशीर्वाद ने व यांच्या  राजकारणाने तुंबलेल्या गटारी व घाणीचे सम्राज्य मुळे वाढलेल्या डासांच्या प्रभावामुळे नागरिक त्रस्त झाले आहे दिवाळी च्या तोंडावर गावातील अनेक व्यापारी ने  लाखो रूपयाचे माल आपापल्या दुकानात भरला आहे पण वीज नसल्याने त्यांचे ही हिरमोड झाले आहे व तसेच गावातील नागरिकाचे पण हिरमोड झाले आहे ऐन  दिवाळीत चोरटयाचा पण सुळसुळाट गावात चालू झाले आहे त्यात वीज नसल्याने अशा वेळेसच चोरटयाचा धुमाकूळ असतोे त्यामुळे महिलांसह नागरिकांमध्ये  घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे महावितरणकडे कर्मचार्‍यांची कमतरता नसतानाही वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार का घडत आहे? त्यावर  उपाययोजना का केल्या जात नाहीत? असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त केला जात आहे वीज आता दिवाळीत खंडीत केली तर आंदोलनाचा इशारा  नान्नजच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी दिला आहे.