Breaking News

नागपुरात सेंट्रल जेलमधील कैद्याचा रुग्णालयात मृत्यू

नागपुर, दि. 25 -  नागपूरच्या सेंट्रल जेलमधील रुग्णालयात कैद्याचा मृत्यू झाला आहे. राकेश जाधव असे या 32 वर्षीय कैद्याचे नाव आहे. या कैद्यावर हत्येचा आरोप होता.
अस्वस्थ वाटू लागल्यानंतर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी इमदाद अली वाहिद अली या 54 वर्षीय कैद्याचाही रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यालाही प्रकृती बिघडल्यानंतर जेलमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागच्या 4 दिवसात 2 कैद्याचा मृत्यू नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये झाल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.