ऐ दिल.. वाद ः मनसेने तोडपाणी केल्याची शंका : अजित पवार
पिंपरी, दि. 25 - मनसेने ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाच्या निर्मात्यांसोबत तोडपाणी केले की काय, अशी शंका येते, असे सांगत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि सिनेमाच्या निर्मात्यांची बैठक झाली. यामध्ये लष्कर निधीसाठी 5 कोटी रुपये देण्याच्या अटीवर ‘ऐ दिल है मुश्किल’च्या रिलीजला परवानगी देण्यात आली.