Breaking News

पोलीस कॉन्स्टेबल देवानंद बर्गे यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) : सिकंदराबाद येथे झालेल्या 13 व्या नॅशनल मास्टर चॅम्पियनशिप स्पेर्धेमध्ये सातारा जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस  कॉन्स्टेबल देवानंद माणिक बर्गे यांनी 50 मीटर ब्रेस्ट स्टोक, 100 मीटर ब्रेस्ट स्टो, 50 मीटर फ्री स्टाईल या तीन प्रकारात गोल्ड, मिडल रिले या प्रकारात सिल्वर  व फ्री स्टाईल या प्रकारात ब्रांझ मेडल प्राप्त केली आहेत. या यशाबद्दल पोलीस अधिक्षक संदीप पाटील व अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांनी त्यांचे  अभिनंदन केले. या कामगिरीबद्दल बर्गे यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे यश प्रशिक्षक भगवान चोरगे यांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले असल्याचे बर्गे  यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक पांडूरंग सूर्यवंशी व शशिकांत गोळे यांनी  बर्गे यांना शुभेच्छा दिल्या.
काही जण वैद्यकिय शिक्षण घेतल्याची पदवी नसल्याने दुर्गम भागात वैद्यकिय व्यवसाय करून उपजिवीका करत होते. आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा  उगारल्याने त्यांनी पळ काढला आहे. त्यामुळ दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांवर आली आहे. शासनाचा  आरोग्य विभाग दुर्गम भागातील लोकांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देणार का? असा सवाल जाणकार व्यक्त करू लागले आहेत. बोगस डॉक्टरांना पळवून  लावले त्याबद्दल जाणकार शासकिय यंत्रणेचे आभार मानत आहेत, त्याबरोबरच मान्यताप्राप्त महाविद्यालयातून वैद्यकिय शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना दुर्गम भागात  आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पाठविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणीही करू लागले आहेत.