Breaking News

जळगांव जा. पालीका निवडणुक काँग्रेस-भारीप बमसं लढणार एकत्र

बुलडाणा, दि. 28 - नगर परीषद जळगांव जामोद निवडणुकी संदर्भात भारीप बमसं व काँग्रेस यांच्यात युतीवर शिक्कामोर्तब झाले गेल्या तिन दिवसांपासुन  वाटाघाटी चालु होत्या. आज त्या वाटाघाटी बैठक अंतीम निर्णय घेवुन संपुष्टात आली. भारीप बमसं कडुन रामकृष्ण रजाने, प्रसेनजीत पाटील, अरुण पारवे ,  संजय पारवे,  अजहर देशमुख, रमेश नाईक, सुनिल बोदडे, राजु पुनावाले तर काँग्रेस पक्षाकडुन कडुन प्रकाश पाटील, स्वातीताई वाकेकर, युनुस खान, विश्‍वास  पाटील ह्यांन युती संदर्भात वाटाघाटीत महत्वाची भुमीका निभावली.
न.प.च्या वाटाघाटीत नगराध्यक्ष पद हे काँग्रेस च्या वाट्याला गेले तर उपाध्यक्ष पद हे भारीपबमंस च्या वाट्याला आले. स्विकृत सदस्यांपैकी प्रत्येकी  एक एक सदस्य वाट्याला आला. 9 प्रभागात एकुण 18 जागा जागांपैकी निम्म्या निम्म्या जागा दोनही पक्षात वाटप झाल्या. युतीच्या संदर्भात झालेल्या वाटाघाटी  चा निर्णय पत्रकार परीषदेत घोषीत करण्यात आला.