Breaking News

शिवसेना माजी नगर सेवक घट्टे काँग्रेसमध्ये

बुलडाणा (प्रतिनिधी), दि. 28 -  येथील शिवसेनेचे माजी नगर सेवक श्यामराव घट्टे यांनी सेनेला सोडचिट्ठी देत काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला आहे. आमदार हर्षवर्धन  सपकाळ यांच्या कार्यालयात मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत श्यामराव घट्टे त्यांच्या पत्नी इंदुताई घट्टे यांना आ.सपकाळ यांच्या हस्ते काँग्रेसचा दुपट्टा देऊन त्यांचा  काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश झाल्याचे घोषित करण्यात आले.
श्यामराव घट्टे यांच्या पत्नी इंदुताई घट्टे ह्या प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांना काँग्रेस तर्फे उमेदवारी मिळणार  असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. शरद राखोंडे, दत्ता काकास, सतीश महेंद्र, अजय बिल्लारी, सुंदरखेड ग्रा.प.सदस्य बाळू  ठाकूर,  प्रा.गायकवाड यांच्यासह अनेक काँग्रेस पधाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.