Breaking News

भारत दौ-यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर

लंडन, दि. 27 - नोव्हेंबरमध्ये भारत दौ-यावर येणा-या इंग्लंडचा संघ आज जाहीर करण्यात आला. या दौर्‍यात इंग्लंड संघ पाच कसोटी सामने  खेळणार आहे. बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळत असलेल्या इंग्लंडच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कर्णधार लिस्टर कुकने संघामध्ये  बदल होणार असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी दिले होते. पण निवड समितीने संघात एकही बदल केला नाही.
संघ जाहीर होण्यापूर्वी गोलंदाज जेक बॉल याच्या सहभागाविषयी प्रश्‍नचिन्ह होते. पण वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा पहिल्या कसोटीसाठी तंदुरूस्त  नसल्यामुळे जेक बॉलला संघात स्थान देण्यात आले आहे.  
संघ : लिस्टर कुक (कर्णधार),मोईन अली, जफर अन्सारी, जॉनी बेअरस्टो, जेक बॉल, गॅरी बलान्स, गॅरेथ बॅटी, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, बेन डकेट, स्टीव्हन  फिन, हसीब हमीद, आदिल रशीद, जो रूट, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स