परभणी / प्रतिनिधी, दि. 01 - येथिल राष्ट्रीय महामार्ग 222 ते ब्राम्हणगाव या मार्गावर बाह्यवळण रस्ता निर्माण करण्यात यावा व त्यासाठी सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत रस्ते विकासाचा 12.65 कोटी अखर्चित निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधिर मानगुंटीवार यांच्याशी सकारात्मक चर्चा दि.28 सप्टेंबरला परभणी विधानसभेचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी करून याकामासाठी अर्थ मंत्र्याकडुन होकार मिळवल्यामुळे या रस्ते कामास लवकरच सुरूवात होणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगीतले. या बाबत अधिक माहिती देतांना आ.राहुल पाटील म्हणाले की, पुर्वीच्या काळात तत्कालीन सरकारकडुन झालेल्या चुकीमुळे शहराच्या मध्यवस्तीतुन राष्ट्रीय महामार्ग गेल्याने शहरातील अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेल्यामुळे वसाहती व प्रभागांची रचना अत्यंत किचकट झाली आहे अशातच या महामार्गावर मोठ्या संख्येने महाविद्यालये व शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची रेलचेल या रोडवर नेहमीच पाहायला मीळते त्यामुळे या महामार्गाला मृत्युचा सापळा असे संबोधले जात असतांना युति शासनाच्या काळात शहर विकासाला प्रथम प्राधान्य देत आपण या विंंंंंषयावर अर्थ व नियोजन मंत्री सुधिर मानगुंटीवार यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला व या विषयावर अर्थ मंत्र्यांनी सकारात्मक विचार करून या कामासाठी निधी देण्याचे मान्य करून परभणीकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असणार्या या प्रश्नावर होकार दर्शविला आहे.जड वाहतुकीस पर्याय म्हणुन गंगाखेड रोड ते नुतन राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणारा हा महामार्ग शहराचा चौफेर विकासाला हातभार लावणारा ठरणार आहे.तसेच आगामी काळात बोरवंड व परिसरात होणार्या औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतींना व उद्योग धंद्यांना या महामार्गामुळे मदत होणार आहे.पुढिल सप्ताहात नियोजन विभागाचे सचीव, मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता (सां.बा.) तसेच बांधकाम विभागाचे सचीव यांच्याशी चर्चा होणार असुन नंतरच्या काळात जिल्हाधिकारी यांचेशी संयुक्त बैठक होणार असल्याचे आ.राहुल पाटील यांनी सांगीतले.