नागपुरात मराठा मोर्चाचं वादळ, ड्रोनला परवानगी नाकारली
नागपूर, दि. 25 - मराठा मोर्चाचे वादळ आज राज्याच्या उपराजधानीत धडकणार आहे. मात्र, आजच्या मोर्चाला सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन कॅमेरा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मोर्चा ज्या ठिकाणाहून सुरु होतो त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. जिथे संपतो त्या ठिकाणी विधानभवन असल्याने ड्रोनला परवानगी नाकारली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या डेडलाईनच्या आधीचा हा शेवटचा मोर्चा आहे.
मागण्या मान्य न केल्यास यानंतर थेट हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरच मोर्चा काढला जाईल, असा इशारा मराठा आयोजकांनी दिला आहे. सकाळी 11 वाजता रेशीमबागेतून हा मोर्चा सुरु होणार आहे. मराठा मोर्चात 15 रुग्णवाहिकांसह 200 डॉक्टरांच्या चमूचा सहभाग राहणार आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, शासकीय दंत महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, केडीके डेंटल कॉलेज आणि लता मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा समावेश असणार आहे.