Breaking News

लाभांश म्हणून अ‍ॅडव्होकेट डायरीची भेट

अहमदनगर (प्रतिनिधी) । 28 - अहमदनगर लॉयर्स सोसायटीतर्फे अ‍ॅडव्होकेट डायरीचे प्रकाशन नगर जिल्हा न्यायालय बार रुममध्ये झाले. ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.  विश्‍वासराव आठरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. 
जिल्हा न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. सतीश पाटील, महाराष्ट्र बार कौन्सिलचे  अशोक पाटील, नगर शहर वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मणराव कचरे उपस्थित होते. सोसायटीच्या झालेल्या लाभांश पोटी इतर वस्तू भेट म्हणून देण्याऐवजी  सर्व वकील सभासदांना अ‍ॅडहोकेट डायरीचे वाटप करणे हा उपक्रम स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. सोसायटीचे  अध्यक्ष अ‍ॅड रविंद्र शितोळे यांनी प्रास्ताविक केले. डायरी दिवाळी पूर्वी देण्याचा आमचा मानस पूर्ण झाला आहे. सभासदांसाठी विम्याचीही सुविधा यावर्षी पासून  देणार आहोत. प्रमुख विधिज्ञांचा डायरी देऊन सत्कार करण्यात आला. अ‍ॅड. अशोक कोठारी,अ‍ॅड.के.एम. देशपांडे, अ‍ॅड. अशोक पाटील,अ‍ॅड. मन्सुर जहागिरदार,  अ‍ॅड. सुभाष काकडे, अ‍ॅड. एस.एस. काळाजी, अ‍ॅड. भाऊ, अवसरकर, अ‍ॅड. लक्ष्मणराव कचरे, अ‍ॅड. वृषाली तांदळे, अ‍ॅड. बलदोटा, अ‍ॅड. लगड सुरेश, अ‍ॅड.  किशोर गाडेकर,विता साठे-कटोळ, अ‍ॅड. उमेश नगरकर उपस्थित होते. लॉयर्स सोसायटीचे सचिव अ‍ॅड. सुधीर टोकेकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अ‍ॅड.  सुरेश कोहकडे यांनी आभार मानले.