Breaking News

पुरस्काराने समाजकार्य करण्याची उमेद निर्माण होते

। नेहरू युवा केंद्र व रयत प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय पुरस्काराचे मान्यवरांच्या उपस्थितीत  वितरण  

अहमदनगर (प्रतिनिधी) । 28 -  पुरस्काराने समाज कार्य जोमाने करण्याची उमेद निर्माण होते,आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने समाजकार्य  प्रत्येकाने केले.पाहिजे ‘पुरस्कार’ प्राप्त झाल्याने शाबासकीची थाप पडल्यासारखे वाटून आणखी प्रभावीपणे कार्य करुन समाजाची सेवा करण्याची इच्छा निर्माण  होते, असे प्रतिपादन ज्ञानदेव बडे यांनी रयत प्रतिष्ठान जेऊर आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय  येथे केले.
याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेविका सुवर्णाताई जाधव, भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त लेफ्टनंट सदाशिव भोळकर,  ओबीसी नेते अशोक सोनवणे, नंदनवन उद्योग समुहाचे दत्ता जाधव,ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.भानुदास होले, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे,  जय युवा अ‍ॅकेडमीचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, अ‍ॅड.अनिता दिघे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना भगवान फुलसौंदर म्हणाले, समाजामध्ये विविध घटकांसाठी सामाजिक संस्था खर्‍या अर्थाने समाजकार्य करीत आहेत. रयत प्रतिष्ठान ही संस्था  खरोखर ‘रयतेसाठी’ रयतेच्या समस्या सोडविणूकीसाठी कार्य करीत आहे. संस्थेला सर्वोतोपरि सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.अशोक सोनवणे यांनी  रयत प्रतिष्ठान सातत्याने समाजाभिमुख उपक्रम राबवित आहे. राज्यस्तरीय लोककला महोत्सवातून लोककलातांना हक्काचा विचारमंच उपलब्ध झालेला आहे.  वयोवृद्ध लोककलावंतांना मानधन मिळावेत इतर सोयीसवलती मिळाव्यात, यासाठी अशा महोत्सवाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे संघटन रयत प्रतिष्ठान करीत  आहे. पहिल्या सत्रात दिवसभर शाहिर कान्हू सुंबे, युनिव्हर्सल डान्स ग्रुपचे सागर अलचेट्टी, स्वरा पवार, रसिक रंजन कला अविष्कार ग्रुपचे धीरज ससाणे, संस्कृती   देशमुख, शुभांजली थोरात, जुन्नर येथील शिवाजी वाणी, मंदाताई फुलसुंदर, शाहिर शिवाजीराव कवडे, परसराम आराधी ग्रुप, नेवासा व शेवगांव येथील रायरद,  खंबायत, शिंदे, शाहिर फुलचंद पाटोळे, हिरामन शिंदे आदिंनी अनेक विविध  लोककला सादर केल्या. नगकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी नगर, बीड,  औरंगाबाद, नाशिक, पुणे, बुलढाणा, जालना जिल्ह्यातील लोककलावंतांनी आपआपल्या लोककला सादर केल्या सर्व लोककलावंतांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र  देऊन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
रयतचे अध्यक्ष प्रा.सिताराम जाधव यांनी प्रास्तविक व मान्यवरांचे स्वागत केले. लोककला महोत्सव व पुरस्कार वितरण समारंभाचे अतिषय प्रभावीपणे विविध  सामजिक संदेश देत सूत्रसंचालन अ‍ॅड.महेश शिंदे यांनी केले तर आभार रयतचे सचिव पोपटराव बनकर यांनी मानले. रयत राज्यस्तरीय पुरस्कार सौ.मेघा  कानिटकर (पुणे), कु.शुभांगी देशमुख (माजलगाव,बीड), मार्गरेट जाधव (नगर), पुष्पा शिंदे (आदर्श माता, पुणे), समृद्धी क्षीरसागर (नगर), संध्या देशमुख,  अनिल उदावंत, रेखा कुलकर्णी, रुपाली जाधव, सिंधू डोमकावळे, अरविंद सगभोर, अशोक भालके, विक्रम घुले, अप्पासाहेब नरवडे, प्रा.अविनाश भंवर, संतोष  दिवे, आशा रोकडे, ललिता सातपुते, बाळासाहेब ढाकणे, उमेश गावडे, सुनिल घोलप, पोपट नितनवरे, संगीता भंडागे, अ‍ॅड.शारदाताई लगड, अरविंद गाडेकर,  साधना मंडलिक, सुमनबाई गुलदगड, अ‍ॅड.मनोज कडू, डॉ.भगवान चौरे, शारदा पुरी, डॉ.सुरेश वणगे (रायगड), संतोष घरात (मुंबई), मुसीरखान कोटकर  (बुलढाणा), मायाताई जाधव, कु.ज्योत्स्ना शिंदे (नगर), आभा अभ्यंकर (पुणे), प्रेमकुमार गिल्डा, वसंत कर्डिले आदि महाराष्ट्र भरातून आलेल्या 397  प्रस्तावामधून 35 व्यक्तींना रयत रत्न, रयत आदर्श शिक्षिका, रयत समाजभुषण, रयत आदर्श माता, रयत समाजसेविका आदि पुरस्काराने सन्मानित करण्यात  आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन गुलदगड, राजेंद्र उदागे, प्रसाद भडके, सलिम सय्यद, श्रीकांत आकेन, जयश्री शिंदे, स्वाती बनकर, अश्‍विनी विधाते, नयना बनकर,  रजनी ताठे, तुषार रणनवरे, अनिल ओहोळ, डॉ.विजय म्हस्के, धीरज ससाणे, वसंत डंबाळे, मोहन ठोंबे, पंकज लोखंडे, कल्पना वाळके, जयश्री फसले, सलिम  शेख, रमेश गाडगे, हरिष ठाकरे, विद्या तनवर आदिंसह जिल्हाभरातील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, लोककलावंत, शासकीय विभागाचे प्रतिनिधी यांनी परिश्रम  घेतले.