Breaking News

बँकांचे 85 हजार कोटी रुपये 57 जणांनी बुडवले

नवी दिल्ली- बुडीत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बॅँकांचे 85 हजार कोटी रुपये केवळ 57 जणांकडे थकीत असल्याची माहिती रिझर्व्ह बॅँकेने सर्वोच्च न्यायालयाला सोमवारी दिली. या 57 जणांची नावे जाहीर करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बॅँकेला झापले.
500 कोटींपेक्षा अधिक कर्ज घेऊन ते थकवणा-या कर्जदारांची यादी रिझर्व्ह बॅँकेने सर्वोच्च न्यायालयाला सादर केली. मात्र, कर्जदारांची नावे जाहीर करण्यास नकार दिला. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर व न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी रिझर्व्ह बॅँकेवर प्रश्‍नांची सरबत्ती केली.
कर्ज घेऊनही ते न फेडणारे लोक कोण आहेत? या बुडीत कर्जदारांची नावे जाहीर का करण्यात येत नाहीत. 500 कोटींपेक्षा कमी कर्ज बुडव्यांची नावे जाहीर करण्यास सांगितल्यास बुडीत कर्जाची रक्कम 1 लाख कोटी रुपये होऊ शकते, असे खंडपीठाने सांगितले.