पाणी बॉटलचे छापील किंमतीपेक्षा जास्त पैसे घेतल्यास तुरुंगवास!
नवी दिल्ली, दि. 15 - एअरपोर्ट, हॉटेल आणि मल्टिप्लेक्समध्ये पाणी बॉटलचे छापील किंमतीपेक्षा अधिक पैसे घेतले तर विक्रेत्याला आता दंडासोबतच तुरुंगवासही होणार आहे. अशा प्रकारच्या विक्रेत्यांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारची कारवाई सुरु आहे.
ग्राहक संरक्षण मंत्री राम विलास पासवान यांनी याबद्दल माहिती दिली. पाणी बॉटल खरेदी करताना अनेकदा छापील किंमतीपेक्षा जास्त पैसे घेतल्याचा अनुभव येतो. मात्र आता जास्तीचे पैसे उकळणार्या विक्रेत्यांवर कारवाई होऊ शकते. तसेच त्यांना तुरुंगवासही होऊ शकतो.
मल्टिप्लेक्स, हॉटेल्स, बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टवर ग्राहकांकडून जवळपास 10 ते 20 टक्के जास्त पैसे उकळले जातात. अनेक ठिकाणी बॉटलवर छापील किंमतही दिलेली नसते. असे विक्रेते, कंपन्या आणि डीलरवर कडक कारवाई होणार असल्याचे पासवान यांनी सांगितले आहे. त्यासाठी ग्राहकांनी पुढे येऊन तक्रार करण्याची गरज आहे असे पासवान म्हणाले.