बदनामीची धमकी देत चुलत बहिणींवर बलात्कार
अहमदनगर, दि. 15 - अहमदनगरमधील कर्जत तालुक्यात दोन चुलत बहिणींवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दोघींवर बदनामीची धमकी देऊन बलात्कार केला जात असल्याची तक्रार कर्जत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पीडित बहिणी पाटेगावच्या रहिवासी असून दोघीही बारावीत शिकतात. आरोपी तुषार लाड आणि राहुल लाड यांनी तीन महिन्यांपासून दोघींवर अत्याचार केला. कर्जत येथील लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले, सौताड्याला नेऊन फोटो काढले, असेही तक्रारीत म्हटले आहे.
आरोपींकडून प्रेम असल्याचे सांगून वारंवार बदनामीची धमकी देत बलात्कार करण्यात आला. कोणाकडेही तक्रार केल्यास बदनामी केली जाईल, अशी धमकी देण्यात आली. अखेर या अन्यायाला वाचा फुटली असून दोन्हीही पीडित बहिणींनी तक्रार नोंदवली आहे. आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.