Breaking News

‘त्या’ अधिकारर्‍यांची ऊडाली झोप..!

लाखोंचा घोटाळा लपविन्यासाठी ‘रात्रीच्या अंधारात’ नव्याने वृक्ष लागवड

बुलडाणा, दि. 24 - सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीच्या नावाखाली लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष  राजेश इंगळे यांनी केला होता.माहिती अधिकारातून मागितलेल्या माहितीतुन भ्रष्टचार उघडकीस आला आहे. वृक्ष लागवडीच्या नावाखाली सामाजिक वनीकरण  विभागाचा लाखो रुपयांचा घोटाळा दैनिक लोकमंथन ने वृत्त प्रकाशित होताच संबधित अधिका-याचे धाबे दणानले व या बातमीचा धसका घेत संबधित वनविभाचे  वृक्ष लागवड अधिकारी यांनी रात्रीच्या अंधारात घाईगरबडित
जाफ्राबाद रोडवर दोन्ही बाजूने वृक्षाची  नव्याने लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे.
शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी सामाजिक वनीकरण विभागास माहिती अधिकारात  सिंदखेडराजा मार्गावरील भारत पेट्रोलपंप पासून ते  पिपळनेर पर्यन्त,जाफ्राबाद मार्ग ते संजय नगर पासून शिराला फाटया पर्यन्त व खंडोबचा माळ या ठिकाणीची वृक्ष लगवाडीची माहिती मागितली असता,वनीकरण  विभागा मार्फ़त सिंदखेड राजा रोड मार्गावर दोन्ही बाजूने 200 वृक्ष् लागवड,जाफ्राबाद रसत्याने 400 वृक्षआणि खंडोबाचा माळ या ठिकाणी 400 रोपांची लागवड  केली अशी माहिती देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात तीनही ठिकाणी तुरलक प्रमाणात वृक्षाची लागवड केल्याचे दिसून आले. व मजुरांच्या नावाने लोखो रुपयाचे  पगार काढण्यात आले. हे लक्षात येताच राजेश इंगळे यांनी या मध्ये दोषी असलेल्या अधिका-यावर कारवाही करावी व घोटाल्याची रक्कम त्या अधिका-या कडून  वसूल करण्यात यावी अन्यथा शिवसंग्राम संघटने तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आशा इशारा एका प्रशिद्धि पत्रकाद्वारे दिला होता.त्यामुळे आपल्यावर कारवाही  होणार या धाकाने वनीकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी जफराबाद रोड वर घाई गरबडीने रोपे लावून लाखो रुपयांच्या केलेला भ्रष्टचार लपविन्याच्या प्रताप  केला.परतु हा प्रकार राजेश इंगळे यांना माहित होताच त्यांनी नविन लावलेल्या झाडाचे फ़ोटो व चित्रीकरण केले आहे, या प्रकारांची तक्रार सामाजिक वनीकरण  विभाग बुलडाणा यांच्याकड़े  करणार असून या मध्ये दोषी अधिका-यावर तत्काळ कारवाही करावी अशी मागनी करणार आहे.