एलसीबी बुलडाणा पथकाची अवैध हातभट्टीवर दारू गाळतांना कारवाई
बुलडाणा, दि. 24 - आज दि. 23 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या माहितीवरुन संजयकुमार बाविस्कर पोलीस अधिक्षक बुलडाणा, श्रीमती श्वेता खेडकर अतिरिक्त पो.अधिक्षक बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाल तसेच प्रतापराव शिकारे यांचे नेतृत्वात बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखा पथक स.पो.नि.विनायक कारेगांवकर, पोहेकॉ अनिल भुसारी, केशव नागरे, पो.ना.विलास काकड, गजानन आहेर, राजु शिरसागर, चालक शेळके यांनी ग्राम देऊळघाट शिवारात रनींग (चालू) हातभट्टी गावटी दारु गाळत असतांना तसेच मोठ्या प्रमाणावर मोठा सडवा साठा पकडला आहे.
यावेळी 32 लिटर हातभट्टी दारु किंमत 3200 रुपये 260 लिटर मोहाचा सडवा किंमत 13,000 रुपये व दारु गाळण्याचे साहित्यासह एकूण 17,670 रुपयांचे मुद्देमाल मिळून आला आहे. आरोपी मदन त्र्यंबक कंकाळ अणखी एक जण रा.देऊळघाट यांचे विरुध्द पोलीस ठाणे बुलडाणा ग्रामीण येथे अप.क्र. 187/2016 कलम-65 क, फ, ड नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील कार्यवाही बुलडाणा ग्रा.पो.स्टे.कडे देण्यात आली आहे.