Breaking News

सदगुरु राष्ट्रसंत तनपुरे बाबांच्या 111 व्या जन्मोत्सव सोहळयाचे गुरुवर्य भास्करगिरींना निमंत्रण

अहमदनगर, दि. 24 - पंढरपुर येथे दि. 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत होणार्‍या वै. राष्ट्रसंत तनपुरे बाबा यांच्या 111 व्या जन्मोत्सव सोहळयाचे  निमंत्रण सोहळयाचे संयोजक ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांना दिले आहे.
पंढरपुर येथील श्री संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्टच्या प्रांगणात होणार्‍या जन्मोत्सव सोहळया निमित्त सोमवार दि. 5 डिसेंबर रोजी वारकरी शिक्षण  संस्थेचे आळंदी येथील अध्यक्ष शांतीब्रम्ह मारुती महाराज कुहेकर व श्री क्षेत्र देवगड चे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते श्री संत तनपुरे बाबा  यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळयासाठी सुमारे पाच हजार भाविकांच्या गाथा पारायणाचे नियोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. बद्रीनाथ  महाराज तनपुरे यांनी नेवासा येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिरामध्ये येऊन हे निमंत्रण गुरुवर्य भास्करगिरी महाराज व अखिल भारतीय वारकरी मंडळाचे  प्रदेशाध्यक्ष व संत ज्ञानेश्‍वर मंदिराचे प्रमुख ह.भ.प. गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख, आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना ही दिले आहे.तसेच सोहळयासाठी नेवासा  तालुक्यातील भाविकांनी ही या पारायण सोहळयाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी केले आहे.