Breaking News

संतुलित बुद्धीचा वापर करावा : रामदास महाराज

। शिरुर तालुक्यातील मिडगुलवाडी येथे हरिनाम सप्ताहातील कीर्तन कार्यक्रम 

पुणे, दि. 28 - मानवी जीवनातील मानवाच्या बुद्धीचे तीन प्रकार म्हणजे संतुलित बुद्धी, सुदृढ बुद्धी व कुपोषित बुद्धी असे असून माणसाने प्रसंग पाहून संतुलित  बुद्धीचा वापर करावा, असे प्रतिपादन ह.भ.प. रामदास महाराज तांबे यांनी केले.
मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील हरिनाम सप्ताहातील कीर्तनसेवेत ते बोलत होते. मिडगुलवाडी येथील सप्ताहात युवक व लहान मुलांचा मोठा सहभाग होता.  आठवडाभर लहान मुलेदेखील कीर्तन व ज्ञानदानाचा लाभ घेताना दिसून आली. तसेच हरिपाठासही मुलांचा सहभाग होता. सप्ताहात दररोज एक महिला व एक  पुरुष यांच्या नावाची चिट्ठी काढून त्यांना ज्ञानेश्‍वरी ग्रंथ देण्यात आला. त्यामुळे मिडगुलवाडी येथील हरिनाम सप्ताह इतर गावांना आदर्श घेण्यासारखा ठरला  असल्याचे मत माजी सरपंच महादू गाजरे, ह.भ.प. पोपटमहाराज मिडगुले, ह.भ.प. भाऊसाहेब मिडगुले यांनी सांगितले.