Breaking News

सातारा जि.प.चा यांत्रिकी विभाग जळून खाक, कर्मचार्‍याचा मृत्यू

सातारा, दि. 27 - सातारा जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाला भीषण आग लागली. या  आगीत संपूर्ण यांत्रिकी विभाग जळून खाक झाला आहे. धक्कादायक म्हणजे आग विझवताना एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. निवृत्ती गांगुर्डे असे मृत कर्मचार्‍याचे नाव आहे. काल रात्री ही दुर्घटना घडली.