Breaking News

पाथर्डीतील पोलिस मारहाण प्रकरणी भाजपचे सहा कार्यकर्ते अटकेत

अहमदनगर, दि. 27 -  पाथर्डीत पोलीस कॉन्स्टेबल महादेव शिंदे यांना मारहाण करणारे सहाही जण भाजपचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.
बुधवारी दुपारी बीड जिल्ह्यातून परमेश्‍वर कर्डिले, सचिन गव्हाणे, बाळू गव्हाणे, पप्पू गव्हाणे, बाबू कर्डिले, सचिन गव्हाणेला अटक करण्यात आली.  पण भाजपशी संबंधित असल्यानेच या सहा जणांवर कारवाई करण्यास उशीर झाल्याचीही चर्चा आहे.
बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी कारवाई करत सहा जणांना अटक केली. पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अल्हनवाडी सोसायटीच्या मतदानावेळी रविवारी म्हणजेच 23 ऑक्टोबरला ही घटना घडली. त्यानंतर तीन दिवसांनी कारवाई करण्यात आली. पाथर्डीमध्ये निवडणुकीच्या बंदोबस्तावर असलेले पोलिस कॉन्स्टेबल महादेव शिंदे यांना जमावाने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत शिंदे जखमी झाले आहेत.