Breaking News

गुटखाबंदी कारवाईचे अधिकार अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनाच

औरंगाबाद, दि. 25 -  गुटखा, सुगंधी पानमसाला बंदीच्या उल्लंघनप्रकरणी कारवाईचे अधिकार पोलिसांना नसून, केवळ अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनाच आहेत, असे परिपत्रक राज्य सरकारतर्फे काढण्यात आले आहे. यापुढे पोलिस अशी कारवाई करणार नाहीत, अशी हमी देणारे शपथपत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालाच्या औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिकेच्या सुनावणी दरम्यान सादर केले आहे.
गुटखाबंदी संदर्भातील प्रकरणांमध्ये पोलिसांना कारवाईचे अधिकार नाहीत, त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईची सर्व प्रकरणे रद्द करण्याचे आदेश खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. व्ही. निरगुडे आणि न्या. इंदिरा जैन यांनी यापूर्वीच दिले होते. या आदेशात कारवाईच्या अधिकाराबाबत निर्देशही स्पष्ट करण्यात आले होते.