शिक्षणाचा उपयोग सामाजिक विकासासाठी व्हावा : राज्यपाल
नाशिक, दि. 24 - नागरिकांना शिक्षणाच्या माध्यमातून सत्याचा शोध घेण्यासाठी सक्षम करणे आणि शिक्षणाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करणे हे शैक्षणिक संस्थांचे मुख्य उद्दीष्ट असून शैक्षणिक क्षेत्रात त्या दिशेने सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न व्हावेत, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 19 व्या ‘जागतिक शांतता परिषदे’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मविभुषण डॉ.अनिल काकोडकर, युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एस.बी.पंडीत, सचिव डॉ.एम.एस.गोसावी,प्राचार्या डॉ.दिप्ती देशपांडे, प्राचार्य व्ही.एन.सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, विद्यापीठ आणि महाविद्यालयातून शिक्षण घेऊन मोठ्या संख्येने पदवीधर बाहेर पडत आहेत. मात्र त्यातील बहुतांशी शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करताना दिसत नाहीत. या बाबीचा गांभिर्याने विचार करून नैतिक मुल्यांचीं सांगड शिक्षणाशी घालण्याबाबत गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. राज्यातील विद्यापीठांनी शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, संशोधनाला चालना देणे, कौशल्य विकास, अध्यापन, संशोधन तसेच प्रशासकीय पदावर महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.