Breaking News

नगर-सोलापूर हायवेवर भीषण अपघात, मायलेकाचा मृत्यू

अहमदनगर, दि. 29 - अहमदनगर-सोलापूर मार्गावर लक्झरी बस आणि अल्टो कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी सातच्या सुमारास मिरजगाव इथे ही दुर्घटना घडली.
लक्झरी कार सोलापूरहून अहमदनगरकडे जात होती. तर अल्टो कार नगरहून सोलापूरच्या दिशेने येत होती. मात्र भरधाव बसची अल्टोला समोरसमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत आई सुरेखा मांडगे (वय 44 वर्ष) आणि मुलगा योगेश मांडगे (वय 24 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. ते अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील रहिवासी होते.