Breaking News

सायरस मिस्त्रींना ’टाटा’, चेअरमनपदी पुन्हा रतन टाटा !

मुंबई, दि. 25 -  सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी पुन्हा रतन टाटा चेअरमनपदाची धुरा सांभाळणार आहेत. चार महिन्यांसाठी रतन टाटा चेअरमनपदी असतील. त्यानंतर सर्च पॅनेल नव्या चेअरमनची निवड करेल.
सायरस मिस्त्री यांनी चार वर्षापूर्वीच म्हणजे 2012 मध्ये टाटा समूहाच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळली होती. चारवर्षापूर्वी रतन टाटांनी सायरस मिस्त्री ही जबाबदारी सांभाळतील असा विश्‍वास व्यक्त केला होता. सायरस मिस्त्री त्यावेळी शापूरजी पालोनजी ग्रुपचे प्रबंध निर्देशक होते. सायरस मिस्त्री 2006 पासून टाटा
ग्रृपच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये आहेत. सायरस मिस्त्री यांचे शिक्षण लंडनमध्ये झाले आहे. इंपेरियल कॉलेजमध्ये त्यांनी सिव्हिल इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. सायरस मिस्त्री यांनी त्यानंतर लंडन बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटमधून शिक्षण घेतले.