पालिकेतील कामगारांचे वेतन वेळेत न दिल्यास कायदेशीर कारवाई
मुंबई, दि. 25 - किमान वेतन अधिनियमांतर्गत पालिकेतील कामगारांचे किमान वेतन न देणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी स्पष्ट केले आहे. कामगार विभागाकडून यापूर्वीच संबंधित महानगरपालिकांना ईमेलद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित अधिकार्यांनी याबाबत आज संध्याकाळपर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मुंबई, नाशिक आणि ठाणे महानगर पालिकेत काम करणार्या सफाई कर्मचार्यांची संख्या जवळपास 8,000 इतकी आहे. तीनही महानगरपालिकांनी आपापल्या सफाई कर्मचार्यांना वेळेत वेतन द्यावे, जर ते देण्यास उशीर झाला तर त्या महानगरपालिकेवर कडक कारवाई केली जाईल अशी भूमिका कामगार मंत्री श्री. पाटील-निलंगेकर यांनी मांडली आहे.
दरम्यान नाशिक महानगर पालिकेने कामगारांचे वेतन आणि थकबाकी उद्यापर्यंत देण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. दोन महिन्यापूर्वी कामगार मंत्र्यांची कामगार संघटनेबरोबर झालेल्या समन्वय बैठकीत कामगारांच्या वेतनविषयक निर्णय घेण्याचे संकेत दिले होते.