Breaking News

टॅल्गो स्पेनला परतणार ?

मुंबई, दि. 27 -स्पेनच्या कंपनीने तयार केलेली बहुचर्चित टॅल्गो रेल्वे स्पेनला परत जाणार असल्याचे वृत्त आहे. ही रेल्वे वापरात आणायची की  नाही याचा निर्णय सरकारी पातळीवरून घेतला गेला नसल्याने ही रेल्वे मायदेशी बोलावण्यात आली आहे. 
दिल्ली - मुंबई या मार्गावर  160 कि.मी. प्रति तास वेगाची चाचणी टॅल्गोने यशस्वीरित्या पूर्ण केली.  दिल्ली ते मुंबई मार्गादरम्याचे अंतर या गाडीने केवळ 12 तासात  पार केले. या पार्श्‍वभूमीवर देशाचे वेगवान रेल्वेचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार असे बोलले जात होते . मात्र लालफितीच्या कारभारामुळे आता ही गाडी स्पेनला  परत नेली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या गाडीबाबत कोणताच निर्णय न झाल्यामुळे ही गाडी परत जाणार असल्याचे समजते. ही गाडी परत स्पेनला गेल्यावर  देशातील वेगवान रेल्वेचे स्वप्न लांबणीवर पडणार, हे मात्र नक्की. या संदर्भात रेल्वेच्या स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता याबाबत वरिष्ठ पातळीवरून  काहीच कळवण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले.