Breaking News

राजपाल यादव राजकारणाच्या मैदानात, नव्या पक्षाची स्थापना

लखनौ, दि. 28 - आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणार्‍या अभिनेता राजपाल यादवने आता राजकारणात एंट्री करत नवीन पक्ष स्थापनेची घोषणा केली आहे.  सर्व समभाव पार्टी (एसएसपी) असं पक्षाचं नाव असणार आहे.
वाद नव्हे तर संवादाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात येत आहे, असं राजपाल यादवने सांगितलं. एसएसपी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार  असल्याचीही राजपाल यादवने माहिती दिली.
निवडणूक लढवून राजकारण कसं करायचं, तसेच लोकशाही मजबूत करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, याचा धडा आपण देणार आहोत, असं यादवने  सांगितलं. केवळ जनतेच्या विकासासाठी आपण राजकारणात येत आहोत. आम्हाला मेट्रो पाहिजे, पण त्याआधी शेतकर्‍यांच्या ऊसाचा पैसा द्यावा, आम्हाला  एक्स्प्रेस महामार्ग पाहिजे, पण त्याआधी गावा गावात रस्ता पोहचला पाहिजे, असं मत राजपाल यादवने व्यक्त केलं.