Breaking News

अलाहाबाद उच्च न्यायालयात स्फोटकांनी भरलेली बॅग आढळली

अलाहाबाद, दि. 28 - सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त असतानाही अलाहाबाद उच्च न्यायालयात स्फोटकांनी भरलेली बॅग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली.
या बॅगेत कमी तीव्रता असणारे बॉम्ब, फटाके आणि अन्य स्फोटके सापडली. यामुळे जास्त नुकसान होण्याची शक्यता नाही. एखाद्या व्यक्तीने खोड काढण्याच्या हेतूने ही बॅग न्यायालयात ठेवली असेल, असे एका अधिकार्‍याने सांगितले. या बॅगेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. बॉम्ब निरोध पथकाने ही बॅग न्यायालय परिसरापासून दूर नेत ते निकामी केले. उच्च न्यायालयातील सुरक्षेच्या त्रुटींमुळे हे कृत्य करण्यास अज्ञात व्यक्ती यशस्वी झाल्याचे न्यायालयातील सुरक्षा अधिकार्‍यांनी मान्य केले. या प्रकारानंतर केंद्रीय पोलीस राखीव दलाच्या पथकाचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.