नवविवाहित पत्नीची आतमहत्या
औरंगाबाद, दि. 24 - प्रेमविवाह केल्यानंतर पती पूर्वीप्रमाणे वेळ देत नाही आणि प्रेम करत नाही या कारणाने नाराज झालेल्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथील पडेगाव परिसरात काल घडली. विशेष म्हणजे आत्महत्या करण्याआधी गळफास घेतानाचा सेल्फी काढून पत्नीने तो फोटो पती आणि आई वडिलांना पाठविली.
या प्रकरणात अधिक माहिती अशी की येथील अदालत रोडवरील आयसीआयसीआय बँकेचे उपव्यवस्थापक तेरम मनोहर जॉर्ज यांनी आपल्या मामाची मुलगी प्रवलिका हिच्याबरोबर एका महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केला होता. ते पडेगाव येथील रामगोपालनगर येथे राहतात. मात्र लग्नानंतर गेल्या काही दिवसात पती आपल्याला पाहिजे तेवढा वेळ देत नाहीत व आपल्यावर प्रेम करत नाहीत असे प्रवलिकाला वाटत होते. त्यामुळे प्रवलिकाने आपल्या पडेगाव येथील राहत्या घरी शुक्रवारी सकाळी गळफास घेतला. त्यावेळ गळफास घेण्यापूर्वी सेल्फी काढून तो पतीकडे आणि आईवडिलांकडे पाठविल्यानंतर तिने गळफास घेतला. या संदर्भात छावणी पोलीस ठाण्यात आत्महत्येला कारणीभूत झाल्याबद्दल तेरम मनोहर जॉर्ज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.