फटाक्यांच्या गोदामाच्या आगीत 8 जणांचा मृत्यू
चेन्नई, दि. 21 - तामिळनाडूमधील शिवकाशी येथे फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
गोदामातील फटाके एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेत असताना हा अपघात झाल्याचे समजते. या आगीमुळे सुमारे 20 वाहने आणि जवळील रुग्णालयाच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामधील दोन जखमींना शिवकाशीच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवकाशी हे फटाक्यांसाठी प्रसिद्ध असून दरवर्षी अशा प्रकारचे अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.